
दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार) :- येथील दिशा ॲकॅडमीच्या मृणाली राणी संदेश पवार आणि मैथिली सुभाष गुजले यांनी JEE Mains आणि MHT CET परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत देशातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून विट्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे.
लहानपणी पासून ISRO मध्ये काम करण्याची मृणाली हिची इच्छा आहे.त्यासाठी ११-१२ मध्ये JEE या अभियांत्रिकी परीक्षेचा भरपूर अभ्यास करून मृणालीने JEE Mains मध्ये 95.39 पर्सेंटाइल मिळवत NIT Shibpur येथे Aerospace Engineering शाखेत प्रवेश मिळवला आहे. मृणाली MHT CET या परीक्षेत सुद्धा 99.33 पर्सेंटाइल गुण मिळाले. योग्य प्रकारे अभ्यास आणि दिशा ॲकॅडमीचे मार्गदर्शन यामुळे लहानपणीचे स्वप्न पूर्ण झाले.
तर मैथिली गुजले हिनेही प्रचंड कष्ट करून MHT CET परीक्षेत 99.44 पर्सेंटाइल गुण मिळविले. तिने देशातील प्रतिष्ठित पुणे येथील COEP अभियांत्रिकी शिक्षण संस्थेत प्रवेश मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करून नामांकित अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश मिळवणे ही विटा शहरासाठी अभिमानाची बाब आहे. मृणाली आणि मैथिली यांच्या या यशामुळे पालक, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दिशा ॲकॅडमी, विटा यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी मिळविलेल्या या यशामुळे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त होत आहेत.
