दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार ):-
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहर विटा नगरपालिका हद्दीतील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईत विटा नगरपरिषद प्रशासनाने सर्वांना समान न्याय देण्याऐवजी राजकीय हस्तक्षेपामुळे निवडक नागरिकांवरच कारवाई होत असल्याचा गंभीर आरोप करत नागरिकांच्या शिष्टमंडळाने विटा नगरपालिका मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांना भेटून चर्चा करत निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, विटा शहरामध्ये विटा नगर परिषदेमार्फत अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू असून विटा शहरातील सर्व प्रकारच्या अतिक्रमणांवर कोणतीही भेदभाव न करता समान निकषांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात काही राजकीय वरदहस्त असलेल्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करून सामान्य व्यवसायिक व नागरिकांना टार्गेट केले जाता असल्याचा आरोप निवेदनात केला आहे, नागरिकांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले आहे की, अतिक्रमण हटवण्याची कारवाई सर्वांवर समान पद्धतीने व पारदर्शकपणे करावी. कोणत्याही राजकीय दबावाखाली निवडक कारवाई होऊ नये. अन्यथा नागरिकांना लोकशाही मार्गाने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, अशी भूमिका निवेदनातून मांडली आहे. तसेच यावेळी विटा नगरपरिषद प्रशासनाने विटा मायणी रोड लागत च्या मिळकत धारकांना नुकत्याच अतिक्रमण काढून घेण्याबाबतच्या बजावलेल्या नोटिसा बाबतही चर्चा करण्यात आली. सदरची कारवाई कोणतीही भेदभाव न करता समान न्यायाच्या तत्त्वावर केले पाहिजे असे आग्रही प्रतिपादन शिष्टमंडळाने केले. तसेच या रस्त्याच्या रुंदीकरणात विस्थापित झालेल्या खाद्यपदार्थ हात गाडी चालकांची हातावरचे पोट विचारात घेऊन त्यांच्यावर कोणताही अतिरिक्त भुर्दंड न बसविता त्यांचे व्यवसायिक पुनर्वसन करावे. अशीही जोरदार मागणी करण्यात आली. अतिक्रमण हटवण्याची कारवाई सर्वांसाठी समान निकषांवर करावी. राजकीय दबावाखाली .निवडक कारवाई करु नये.शहरातील सर्व प्रकारच्य अतिक्रमणांवर निष्पक्ष व पारदर्शक कारवाई करावी. अन्यथा नागरिक लोकशाही मार्गाने आंदोलन छेडतील असा इशारा निवेदनात दिलेला आहे.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष किरण भाऊ तारळेकर.माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अजित गायकवाड. नगरसेवक सुमित गायकवाड. अविनाश चोथे. प्रशांत कांबळे राहुल हजारे. माधव रोकडे अमित भोसले. दहावीर बापू शितोळे उपस्थित होते. निवेदन स्वीकारल्यानंतर मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी याबाबत योग्य व समान न्यायानेच कार्यवाही करण्याचे शिष्टमंडळास अश्विसीत केले.
