दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) -;
दि.07/08/26 रोजी स्थागुशाचे पथक मालाविषयी गुन्हे उघडकीस आणणे कामी रवाना होवुन पेट्रोलिंग करीत असताना पथकाने गुप्त बातमी वरून अनसुर्डा शिवारातील फॉरेस्ट मध्ये पवनचक्कीचे पाँइट वरून चोरी करणारी टोळी दाट झाडीमध्ये थांबली आहे. अशी माहिती मिळाल्याने पथकाने फॉरेस्ट चे जवळ जावुन वाहने जवळपास थांबवुन पायी चालत जात असताना पोलीसांना पाहुन त्या दाट झाडी मधुन काही इसम पळुन जात असताना त्यांचा पाठलाग करून अतिशय शिताफीने पकडुन त्यांना ताब्यात घेवुन त्यांची अभिलेखावरुन गुन्हयाविषयक माहिती घेतली असता त्यांचेवर धाराशिव जिल्हयात तसेच बाहेर जिल्हयात अनेक चोरीचे गुन्हे असलेबाबत खात्री झाल्याने त्यांचेकडे पवनचक्कीचे चोरीसंदर्भाने विचारपुस केली असता त्यातील नंदु रामा शिंदे रा. खामकरवाडी याने खामकरवाडी येथील त्याचे नवीन बांधकाम असलेल्या ठिकाणी पवनचक्कीचे साहित्य कॉपर केबल, रॉड, तार असे साहित्य असलेबाबत सांगीतले. त्यावरून पथकाने लागलीच खामकरवाडी येथे जावुन नमुद पवनचक्कीचे साहित्य कॉपर केबल वायर, कॉपर रॉड, तार असे ताब्यात घेवुन नमुद मुददेमालाबाबत माहिती घेतली त्याअनुषंगाने पोलीस ठाणे वाशी, येरमाळा येथे गुन्हे दाखल असलेबाबत माहिती मिळाली तरी आरोपी नामे 1) अनिल नाना काळे वय 40 वर्षे रा. मस्सा 2) नंदु रामा शिंदे वय वर्षे रा. खामकरवाडी 3) बबलु ऊर्फ राम शिवाजी शिंदे वय 29 वर्षे रा. खामकरवाडी 4) शाम ऊर्फ बाबा शंकर शिंदे वय 28 वर्षे रा. खामकरवाडी यांचे ताब्यातुन पवनचक्कीचे साहित्य कॉपर केबल वायर, कॉपर रॉड, तार व गुन्हयात वापरलेली बोलेरो जीप असा 4,48,000/- रू. चा मुददेमाल जप्त करून पवनचक्कीचे चोरीचे एकुण 04 गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधिक्षक श्री. सचिन पांडकर, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सपोनि श्री. सचिन खटके, पोलीस हवालदार/ विनोद जानराव, नितीन जाधवर, दयानंद गादेकर, पोलीस नाईक / बबन जाधवर, पुष्कर मुंगळे, चापोह/महेबुब अरब, प्रकाश बोईनवाड, रोहित दंडनाईक यांचे पथकाने केली आहे.
