दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी( शिराज शिकलगार)-; सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कल चे माजी आमदार माजी नगराध्यक्ष ॲड सदाशिवराव भाऊ पाटील व युवा नेते वैभव दादा पाटील यांचे कट्टर समर्थक श्री मोहन काळे यांचे चिरंजीव व सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांचे बंधू श्री विजय मोहन काळे यांच्या वाढदिवसानिमित्त विटा नगरपालिकेचे माजी नगरसेवक उद्योजक श्री पृथ्वीराज बाबा पाटील व त्यांचे सहकारी यांनी काळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, अशीच तुझी प्रगती होत राहो, पहिल्यापासून आमच्या पाटील कुटुंबावरती काळे कुटुंबाचे पहिल्यापासून विश्वासनीय म्हणून ते आमच्याबरोबर आहेत असे म्हणत पृथ्वीराज बाबा पाटील यांनी सामाजिक कार्यकर्ते श्री विजय मोहन काळे यांना शाबासकीची थाप देत त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या, यावेळी विटा नगरपालिका माजी आरोग्य सभापती फिरोज भैया तांबोळी, जावीद तांबोळी, शंकरराव शिंदे, व मित्रमंडळी उपस्थित होते.
