


दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार) :-गुरुपौर्णिमेचा निमित्ताने विटा रोटरी परीवाराच्या वतीने समाजाच्या विविध क्षेत्रात निरपेक्ष व समर्पीत सेवा करणाऱ्या तीन गुरुसमान व्यक्तींचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यामध्ये इस्कॉन या कृष्णभक्त आध्यात्मिक संस्थेच्या वतीने विटा शहर व परीसरात गेली अनेक वर्षे सात्तत्याने समर्पीत भावनेने कार्यरत असलेले मार्गदर्शक दिनानाथ प्रभु तर शिक्षणदानाचे काम करीत असताना अनेक नव्या पीढ्या सुसंस्कारीत घडवीण्याकामी ज्यांनी आयुष्यभर सेवाभावनेने योगदान दीले ते दगडु दाते गुरुजी आणि पोलिस दलात कार्यरत असलेल्या व कै.अशोक कामटे मॅरॅथॅानच्या माध्यमातुन क्रीडा क्षेत्रात सात्तत्याने कार्यरत असलेले श्रीकांत कुंभार या तीन सामाजीक गुरुंना सन्मानपुर्वक अभिवादनासह सनम्मानपत्राने गौरवीण्यात आले.
विटा यंत्रमाग संघाच्या सभागृहात संपन्न झालेल्या या सन्मान सोहळ्यास विटा रोटरीचे
अध्यक्ष कांतीलाल जोगड, सचिव रमेश लोटके, प्रविण दाते, डॉ. रामचंद्र नलवडे, सचिन अबदर, सचिन भंडारे, बालाजी कदम, आशिष म्हेत्रे, नरेन म्हेत्रे, विक्रम जैन, मन्सूर पटेल, सागर म्हेत्रे या रोटरी सदस्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
