महाराष्ट्र

पलूस सहकारी बँकेस सुमारे १० कोटींचा नफा : चेअरमन वैभवराव सुर्यवंशी पुदाले

सांगोला, नातेपुते, टेंभुर्णी, वाई येथे नवीन शाखेचा प्रस्ताव

 

पलूस :

सन २०२३-२०२४ या नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये बँकेस तरतुदपुर्व १० कोटीपेक्षा अधिक ढोवळ नफा झालेला आहे बँकेच्या मा संचालक मंडळाने स्वर्गीय मा. वसंतरावजी पुदाले दादा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बँकेचा कारभार पारदर्शकपणे केलेने तसेच बँकेच्या सर्व ग्राहकांच्या सहकार्याने व विश्वासावर बँकेचा एकूण व्यवसाय ९०७.६३ कोटीपेक्षा अधिक झालेला आहे. आर्थिक वर्षात बँकेने व्यवसायात अतिशय चांगली प्रगती केली असून विकमी नफाही मिळवला आहे, तसेच बँकेचे निव्वळ एनपीए प्रमाण ०% करणेची परंपरा कायम ठेवणेत बँक यशस्वी झालेली आहे. बँकेची झालेली चौफेर प्रगतीही केवळ सभासद, कर्जदार, ठेवीदार, ग्राहक यांच्या बहुमोल सहकार्यामुळेच झालेली आहे बँकेने गतवर्षी सभासदांना ११ % दराने लाभांश दिला. या वर्षीही सभासदांना ११% दराने लाभांश देणेचा मानस आहे बँकेच्या सभासंदांनी बँकेच्या माननीय संचालक मंडळावरील दाखविलेला विश्वास मा. संचालक मंडळाने सार्थ करून दाखविला आहे. यापुढेही बँकेचे मा संचालक मंडळ निःपक्षपातीपणे काम करीत राहील, बँकेच्या उल्लेखनीय प्रगतीमध्ये बँकेचे सर्व सभासद, ग्राहकवर्ग, मा, संचालक मंडळ अधिकारी, शाखाधिकारी वसूली अधिकारी व सर्व सेवक यांचे अत्यंत मोलाचे योगदान राहिले, आर्थिक वर्षात बँकेने जत. आटपाडी, कवठेमहंकाळ या नवीन तीन शाखा सर्व सोयीनींयुक्त सुरू केल्या तसेच रिझर्व्ह बँकेकडे नवीन ४ शाखा उघडणेचा प्रस्ताव पाठविला असलेची माहिती बँकेचे विद्यमान चेअरमन मा. श्री. वैभवराव सुर्यवंशी (पुदाले) यांनी याप्रसंगी दिली,

बँकेच्या एकूण ठेवी ५३३ कोटीपेक्षा अधिक व एकूण कर्जे ३७४ कोटीपेक्षा अधिक झाली आहेत, आर्थिक वर्षात व्यवसायात १२८ कोटी इतकी विक्रमी वाढ झाली असलेची माहिती बँकेचे व्हाईस चेअरमन श्री, प्रकाश पाटील (आप्पा) यांनी दिली.

बँकेचा कारभार हा नेहमीच अत्यंत पारदर्शक राहिला असून चालू वर्षी बँकेने व्यवसायात भरीव प्रगती केली असून पुढील वर्षी बैंक १००० कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण करणार आहे. बँकेने अद्यावत सुविधाही ग्राहकांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने एटीएम, मोबाईल बँकिंग, आरटीजीएस, एनईएफटी आयएमपीएस. क्यु आर कोड UPI यासारख्या सुविधा दिल्या जात आहेत, बँकेचे सी. आर. ए. आर. चे प्रमाण १४% पेक्षा अधिक आहे पलूस सहकारी बैंक सतत रिझर्व्ह बँकेच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करीत आलेली आहे अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल घारे यांनी दिली,

यावेळी बँकेचे विदयमान संचालक श्री बजरंग उर्फ बळवंत सुर्यवंशी, श्री जगदीश मोहोळकर, श्री शिवप्रसाद शिंदे थी, लालासाहेब संकपाळ पाटील, श्री चंद्रकांत गोंदील श्री ईश्वर सिसाळ, श्री. पुष्कराज पवार, श्री. प्रकाश कारंडे श्री नितीन खारकांडे श्री. मनोहर बुचडे श्री. प्रकाश भोरे श्री. नितीश शहा सौ, अश्विनी, गोंदील सौ, मेघा येसुगडे तसेच वरिष्ठ अधिकारी श्री. सुहास सुर्यवंशी, श्री प्रकाश डाके श्री. राजू जाधव, श्री. अतुल कुलकर्णी, सर्व शाखाधिकारी, जेष्ठ सभासद व पत्रकार उपस्थित होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!