महाराष्ट्र

भिलवडी वाचनालयाच्या 52 व्या वाचन कट्ट्यास वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गुणीजणांचा सत्कार ; उद्योगपती गिरीश चितळे यांची उपस्थिती

 

भिलवडी :

सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी वाचनालयाचा 52 वा वाचन कट्टा एक एप्रिल 2024 रोजी वाचकांच्या उत्तम प्रतिसादात संपन्न झाला वाचन कट्टा उपक्रमाच्या अध्यक्षपदी गिरीश चितळे होते यावेळी लोकमत सांगली आवृत्ती प्रमुख संपादक हनुमंत पाटील वरिष्ठ व्यवस्थापक हसबणीस साहेब लेखक दत्ताजीराव शिंदे वसुधा काटेकर स्वप्निल मोरे यांची विशेष उपस्थिती होती प्रारंभी वाचन कट्टा उपक्रमाचे प्रमुख सुभाष कवडे यांनी सर्वांचे स्वागत करून आजवरच्या वाचन कट्टा उपक्रमाचा आढावा घेतला वाचन कट्ट्यांनी मला काय दिले या विषयावर वाचकांनी आपली मते मांडावीत असे आवाहन केले वाचन कट्ट्याने मन समृद्ध झाले विचार समृद्ध झाले विविध पुस्तकांचा परिचय झाला काय वाचावे हे कळाले ज्ञानवृद्धी झाली दिवाळी अंकांचे जग कळाले उत्तम श्रीमंत मनाचे मित्र लाभले पुस्तकांची गोडी वाढली अशा विविध प्रतिक्रिया वाचकांनी नोंदविल्या यावेळी कृषी सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल स्वप्निल मोरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला माजी सैनिक मेजर उत्तम कांबळे यांनी वाचनालयास पाच हजार रुपयांची देणगी दिली तसेच रमेश चोपडे प्राचार्य डॉक्टर दिनकरराव पाटील दत्ताजीराव शिंदे यांनी वाचनालयास पुस्तके भेट दिली समारोप गिरीश चितळे यांनी केला यावेळी हनुमंत पाटील हसबनी साहेब दत्ताजीराव शिंदे स्वप्निल मोरे यांनीही मनोगत व्यक्त केले 53 व्या वाचन कट्ट्यावर सुभाष कवडे यांची कविता या विषयावर वाचकांनी मते मांडावीत असे संयोजक यांनी सांगितले या वाचन कट्ट्याला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती त्यामुळे पुढील एक दोन महिन्यात पासून महिलांसाठी स्वतंत्र वाचन कट्टा सुरू करण्याचा मनोदय संयोजक कार्यवाहक सुभाष कवडे यांनी व्यक्त केला शेवटी ज कृ केळकर यांनी आभार मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!