मानसिंग को-ऑप. बँक लि., दुधोंडी बँकेस 7 कोटी 40 लाख नफा : संस्थापक जे.के. (बापू) जाधव
सांगली जिल्ह्यात सभासदांचे हित जपणारी मानसिंग को-ऑप. बँक लि., दुधोंडी

पलूस/ दुधोंडी :- 31 मार्च 2024 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात मानसिंग को-ऑप. बँक लि., दुधोंडी या बँकेस रु.7 कोटी 40 लाख नफा झालेची माहिती बँकेचे संस्थापक श्री.जे.के. (बापू) जाधव यांनी दिली. मार्च अखेर बँकेकडे 6103 सभासद असून बँकेकडे एकूण ठेवी 203 कोटी 75 लाख इतक्या असून कर्जवाटप रू.163 कोटी 44 लाख इतके केलेले आहे. गुंतवणूक रु.56 कोटी 74 लाख आहे तसेच बँकेचा नेट एन.पी.ए.0.00 टक्के इतका आहे सी.आर.ए.आर 13.25 टक्के इतका आहे तसेच प्रती कर्मचारी व्यवसाय 7 कोटी 34 लाख आहे. बँकेची थकबाकी 3.88 टक्के इतकी असून बँकेचे भाग भांडवल रू. 5 कोटी 01 लाख इतके आहे. एकूण राखीव व इतर निधी रु.28 कोटी 69 लाख इतका असल्याची माहिती दिली. बँकेच्या सध्या दुधोंडी, सांगली, पलूस, विटा व कराड येथे पाच शाखा असून. पाच शाखापैकी प्रधान कार्यालयासह चार शाखा स्वमालकीच्या वास्तूत सुरू आहेत. बँकेमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची विज बिले स्विकारली जातात. तसेच पॅन कार्ड काढणेची सुविधा तसेच आधार पेमेंट मुळे सर्व शासकीय अनुदान जमा होण्याची सुविधा सर्व शाखामध्ये आहे. एसएमएस सुविधा ग्राहकांना मोफत दिलेली आहे बँकेला आयएफएससी कोड असल्यामुळे आरटीजीएस व एनईएफटी मुळे त्वरीत फंड जमा होतात. ग्राहकांच्या सेवेसाठी बँकेने कोअर बँकिंग प्रणाली चालू केलेली असून मुख्य शाखा दुधोंडी येथे एटीएम, कॅश डिपॉझीट मशीन व पासबुक प्रिंटीग मशीन बसवले आहे ग्राहकांना रूपे डेबीट कार्ड मुळे देशभरातील 250000 पेक्षा जास्त एटीएम मधून पैसे काढता येतात तसेच ग्राहकांच्या सोईसाठी मोबाईल बँकिंग सुविधा सुरू केलेली आहे तसेच युपीआय सुविधा दिल्यामुळे ग्राहकांना घरबसल्या बँकिंग व्यवहार करता येतात तसेच लवकरच व्हॉटसअॅप बँकिग सुविधा ग्राहकासाठी सुरू करीत आहोत, अशी माहिती बँकेचे चेअरमन श्री. सुधीर (भैय्या) जाधव व व्हा. चेअरमन श्री. दौलतराव लोखंडे, बोर्ड ऑफ मॅनेंजमेंट चेअरमन श्री. हणमंत कारंडे, जनरल मॅनेंजर सभांजी जाधव यांनी दिली. याप्रसंगी बँकेचे सर्व संचालक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.