ताज्या घडामोडी
सांगली जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांना जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने निरोप
कोल्हापूर विभागाचे सहायक संचालक (माहिती) फारूख बागवान यांनी स्वीकारला

सांगली : जिल्हा माहिती अधिकारी सांगली या पदाचा कार्यभार आज जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांच्याकडून कोल्हापूर विभागाचे सहायक संचालक (माहिती) फारूख बागवान यांनी स्वीकारला. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. तर मावळत्या जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांची नाशिक येथे जिल्हा माहिती अधिकारी पदावर बदली झाल्याने त्यांना जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आज निरोप देण्यात आला.
यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील अमोल पाटील, शंकरराव पवार, सुधीर पाटील, सागर दळवी, नागेश वरूडे, प्रदीप थोरात उपस्थित होते.