बौद्ध लोकांनी 22 प्रतिज्ञांचे पालन केल्यास जीवन सफल : उद्योगपती सी आर सांगलीकर
अंकली येथील दुसरी धम्म परिषद उत्साहात : मान्यवरांची उपस्थिती

सांगली / डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा बौद्धांनी पाळाव्यात.प्रतिज्ञा पाळल्याने आपल्या जीवनात चांगल्या प्रकारे निश्चित बदल घडेल असे मत धम्मभूमी गुगवाडचे निर्माते उद्योगपती सी.आर. सांगलीकर यांनी उद्घाटन मनोगतामध्ये व्यक्त केले.
बोधिसत्व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळाच्यावतीने अंकली ता.मिरज येथे आयोजित केलेल्या दुसऱ्या धम्म परिषदेत उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
उद्योगपती मा.सांगलीकर म्हणाले 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणास बौद्ध धम्म देताना 22 प्रतिज्ञा दिल्या आहेत. त्यातील प्रतिज्ञा पाळाव्यात एकदम बदल घडणार नाही,परंतु आपण जास्तीत जास्त प्रतिज्ञा पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे.त्यामुळेच आपला उद्धार होणार आहे.दुस-यांच्या धर्माचे अनुकरण करु नका.कर्म कांडात अडकू नका.त्यातून बाहेर या.आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्या.धम्म परिषदेला धम्म बंधु भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजे.आपला बौद्ध धम्म समजून घेणे आवश्यक आहे. आणि त्याचे पालन करण्याचा प्रयत्न करा.त्याशिवाय धम्म वाढणार नाही.
यावेळी धम्म परिषदेचे प्रमुख वक्ते प्रा.सुकुमार कांबळे यांनी बौद्ध धम्मात येणाऱ्या बांधवांचा स्वीकार करावा, भेदभाव करू नका असे मत व्यक्त करत मनोगत व्यक्त केले.प्रा.डॉ.जगन कराडे, यांनीही मनोगत व्यक्त केलं. तसेच ज्येष्ठ साहित्यिक प्रा.गौतमीपुत्र कांबळे यांनी धम्म परिषदेस शुभेच्छा दिल्या.परिषदेचे अध्यक्ष पुज्य भदंत आर.आनंद स्थविर होते.पूज्य भदंत एस.संबोधी स्थविर यांची उपस्थिती होती.दुसऱ्या सत्रातील प्रमुख वक्त्या डॉ.दीपा श्रावस्ती आयु.गौतम कांबळे हे उपस्थित होते.
परिषदेचे स्वागत व प्रास्ताविक शशिकांत कोलप यांनी केले सूत्र संचालन जितेंद्र कोलप यांनी चांगल्या प्रकारे केले.
परिषद यशस्वी करण्यासाठी मोहन घोलप,प्रल्हाद कांबळे,शशिकांत कोलप,हर्षद कांबळे,क्षितिज कांबळे, अमोल भाले,प्रदीप कांबळे यांच्यासह बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळ,समस्त बहुजन व बौद्ध समाज आणि विविध तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. धम्म परिषदेस सी.आर. सांगलीकर फौंडेशनचे किरण पाटील, सचिन इनामदार, महेश शिवशरण प्रा.संजीव साबळे,अंकलीतील बौद्ध बांधवासह सांगली,मिरज, जयसिंगपूर,परिसरातील धम्म बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.पहिल्या सत्रा नंतर भोजनदान देण्यात आले.