देश विदेश

बेडकिहाळ येथे डॉ विक्रम शिंगाडे यांचा नागरी सत्कार

 

बोरगाव: डॉ. विक्रम शिंगाडे यांना आत्मश्री प्रतिष्ठान नवी दिल्ली यांच्या वतीने डिसेंबर 6 रोजी श्री. डी व्ही सदानंदगौंडा मा. मुख्यमंत्री कर्नाटक सरकार मा केंद्र सचिव, शोभा करंदाजी क्रुषी शेतकरी कल्याण राज्य सचिव कर्नाटक सरकार तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ सी सोमशेखर आय.ए.एस.अधिकारी बेंगळुरू यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व मानधन देऊन आंतरराष्ट्रीय समाजभूषण गोल्ड स्टार अवार्ड ने दिल्ली मधील जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी मध्ये सन्मानित करण्यात आले. त्यामुळे केंद्रीय संवाद पत्रकार संपादक कल्याणकारी संघटना न्यु दिल्ली व बेडकिहाळ गौरव समिती यांच्या वतीने डॉ विक्रम शिंगाडे यांचा सत्कार समारंभ सोहळा दि-17 डिसेंबर रोजी अम्रुत गार्डन शमणेवाडी येथे आयोजित करण्यात आला होता.
प्रथम कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.शेखर प्रभात ज्येष्ठ समाजसेवक एक्संबा, तसेच प्रकाश कदम प्रमुख वक्ते, कवी, लेखक कोगनोळी व सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
आपल्या मनोगतामध्ये प्रकाश कदम सर म्हणाले की गेल्या अनेक वर्षांपासून डॉ विक्रम शिंगाडे हे सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत आहेत. अनेक सामाजिक उपक्रम अनेक वर्षांपासून राबवत आहेत. त्यांना अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना चेन्नई युनिव्हर्सिटी कडुन सामाजिक क्षेत्रातील डॉक्टरेट पदवीने देखील सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे कार्य सर्वांनी प्रेरणा घेण्यासारखे आहे.असे ते म्हणाले.
मलगौंडा पाटील पी.के.पी. एस. बेडकिहाळ उपाध्यक्ष म्हणाले की आमच्या गावामध्ये विक्रम चे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांना समाजसेवेची आवड आहे. ते नेहमी सामाजिक कार्य करन्यासाठी तत्पर असतात. मला त्यांचे कार्य आवडते म्हणून मी त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात मी सहभागी असतो. आणि नेहमी आम्ही तुमच्या पाठीशी असु असे ते म्हणाले.
प्रा डी एन दाभाडे म्हणाले की डॉ विक्रम शिंगाडे हे माझे विद्यार्थी आहेत. मला खुप अभिमान वाटतो की माझ्या विध्यार्थाला आंतरराष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार मिळाला. पुरस्कार मिळणे एवढे सोपे नाही. त्यासाठी खुप कार्य करावे लागते. आणि विक्रम शिंगाडे हे कोणतीही अपेक्षा न बाळगता समाजासाठी नेहमी कार्य करत असतात. माझा विद्यार्थी गावातुन दिल्ली पर्यंत पोहचला. ही अभिमानास्पद गोष्ट आहे. असे ते म्हणाले.
पुढे बाळासाहेब शिंदे सामाजिक कार्यकर्ते बेडकिहाळ म्हणाले की, विक्रम या नावातच खुप मोठा विजय आहे. आणि अनेक अनाथ आश्रमांना भेट देऊन त्यांना अन्नधान्य, औषधे, शालेय साहित्य, ब्लेकेंटस असे अनेक वस्तू ते वाटप करत असतात. सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करत असतात.असे अनेक सामाजिक उपक्रम नेहमी राबवत असतात. असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शेखर प्रभात सर म्हणाले की विक्रम चे कार्य हे कौतुकास्पद आहे. मी एक ज्येष्ठ समाजसेवक आहे आणि माझा वारसा विक्रम पुढे नेणार यात काही शंका नाही. आंतरराष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार हा अगदी योग्य व्यक्तीला मिळाला आहे असे ते म्हणाले
तसेच सर्वच मान्यवरांनी डॉ विक्रम शिंगाडे यांच्या कार्याचा कौतुक करुन त्यांना शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले.
त्यावेळी ॲड सनदी सर गळतगा, ॲड कुट सर भोज, डॉ नितीन गोंधळी ब्लु पॅथर संस्थापक सांगली, धनंजय खांडेकर ब्लु पॅंथर कार्याध्यक्ष सांगली, दत्ता मांजरेकर सामाजिक कार्यकर्ते इचलकरंजी, अजित धन्नापगोळ पी के पी एस. बेडकिहाळ मुख्य कार्यनिर्वाहक, बी जी देशमुख सामाजिक कार्यकर्ते इचलकरंजी, अरुण यादव, सौ महादेवी यादव, जगण जाधव, राजु कांबळे, रावसाहेब मेल्लाळे, राजु संकपाळ, अजित कांबळे, तसेच सखाराम जाधव, संदीप पाटील, रावसाहेब कांबळे,उदय
पांगिरे, तसे केंद्रीय संवाद पत्रकार संपादक कल्याणकारी संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच बेडकिहाळ ग्रामस्थ उपस्थित होते.
सर्वच मान्यवरांनी डॉ विक्रम शिंगाडे यांना आंतरराष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
आभार व सुत्रसंचलन अजित कांबळे यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!