मिरज येथील सामाजिक कार्यकर्ते जैलाब शेख यांची महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड

सांगली : – सामाजिक कार्यकर्ते जैलाब शेख यांनी नुकताच महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला.त्यांची सांगली जिल्हा अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली.
या निवडीचे पत्र पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजय (भैय्या) सोनवणे यांच्या हस्ते जैलाब शेख यांना देण्यात आले.यावेळी सोलापूर जिल्हा अध्यक्ष महेंद्र जाधव,युवक जिल्हाध्यक्ष भूषण ननवरे,असंख्य कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष संजय सोनवणे म्हणाले,जैलाब शेख हे गेली दोन दशकाहून अधिक काळ चळवळीत काम केलेले अनुभवी व सर्व प्रश्नांची जाण असणारे जिल्ह्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असून ते फुले,शाहू, आंबेडकरांच्या विचारांचे आहेत. त्यांचे कार्य समाजातील दिनदुबळ्यांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात तसेच रस्त्यावर उतरुन त्यांच्या मागण्या प्रशासनासमोर मांडून ते प्रश्न किंवा अडचणी निकाली काढत असत.त्यांचे कार्य समाजासाठी लाभदायक व कौतुकास्पद आहे.तसेच फुले, शाहू, डॉ.आंबेडकर यांच्या विचारांवर श्रध्दा असणार्या सर्व जाती धर्माच्या जनतेला सोबत घेवून पक्ष वाढवतील असा विश्वासही असल्याचा त्यांनी यावेळी सांगितले.