कोल्हापूर येथील पोरे शिक्षण संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
प्रमुख पाहुणे म्हणून अर्थतज्ञ ङाँ. चेतन अरूण नरके यांची उपस्थिती

कोल्हापूरः अनिल पाटील
कोल्हापूरातील पोरे कुटुंबियांच्या पोरे शिक्षण संस्था, संचलित शिशुकुंज विद्यामंदिर’चे वार्षिक स्नेह संमेलन ऊत्साहात पार पङले. या कार्यक्रमास प्रमूख पाहूणे म्हणून अर्थतज्ञ ङाँ. चेतन अरूण नरके उपस्थित होते. यावेळी मोठ्या उत्साहात सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. पोरे कुटुंबीयांची 29 वर्षाची शैक्षणिक सेवेची परंपरा त्यांनी अतिशय कष्टातून उभी केली आहे. शिवाजी पेठेतील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगल्या पध्दतीने त्यांनी शैक्षणिक संस्था चालवली आसल्याचे प्रतिपादन अर्थतज्ञ ङाँ. चेतन अरूण नरके यांनी केले. यावेळी त्यांनी पालकांशी सविस्तर संवाद साधता आला. त्यांच्या शैक्षणिक समस्या जाणून घेतल्या. शिवाजी पेठेतील माझे मित्र व त्यांची मुलं यांच्यासोबत वेळ घालवण्याची संधी मला मिळाली व विलोभनीय सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वाद घेता आला. याबद्दल आयोजकांचे यावेळी त्यांनी आभार मानले.