महाराष्ट्रराजकीयसामाजिक

आरगेचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी सरपंच एस आर बापू पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा जनसुराज्य पक्षात प्रवेश ; जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत दादा कदम यांच्या हस्ते सन्मान

 

दर्पण न्यूज मिरज : -सांगली जिल्हा मिरज तालुक्यातील आरग गावातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी सरपंच एस आर बापू पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकून असंख्य कार्यकर्त्यांच्या सह जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला. यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष  समित दादा कदम यांच्या हस्ते प्रवेश प्रक्रिया पार पडली.

मिरज तालुक्यातील नाराज झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाची वाट धरली आहे. त्यामुळे जनसुराज्य पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे.

जनसामान्यांचे धडाडीचे नेतृत्व जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास वाढल्याने जिल्ह्यातील अनेक पक्षातील राजकीय नेते हे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वाटेवर आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसुराज्य शक्ती पक्षाने जोरदार तयारी सुरू केल्याने पक्ष बांधणी जोरात सुरू आहे. आज शुक्रवार दिनांक २७ रोजी एस आर बापू पाटील यांच्यासह माजी व्हॉइस चेअरमन अरुण कवाळे,  ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पाटील, शिंदेवाडी उद्योजक सचिन पवार , समित पाटील, सुधाकर खोत ,अक्षय पाटील, आनंदराव पाटील, सचिन मगदूम ,अक्षय पाटील, नितीन पाटील, म्हाळू कोरबु, विश्वजीत पाटील याचा पक्ष प्रवेश झाला .

यावेळी जनसुराज्य पक्षाचे ज्येष्ठ नेते महादेव अण्णा कुरणे, जिल्हाध्यक्ष आनंद सागर पुजारी, शहर जिल्हाध्यक्ष पंकज म्हेत्रे ,मिरज शहर अध्यक्ष योगेश दरवंदर वड्डीचे माजी उपसरपंच राजू वजीर उप महापौर आनंद देव माने रमेश नाईक पिंटू गौड अनिल देवकाते पंच , उपस्थित होते .

एस आर बापू यांना शासकीय कमिटीवर पद देऊन न्याय देणार, असे आश्वसन समित दादा कदम यांनी दिले,

यावेळी  जनतेच्या कामासाठी इतर नेत्यांच्या दारात दोन ते तीन तास बसावे लागते ,पण एक फोन वर काम करणारे समीत दादा कदम याच्या पाठीशी उभे राहणार,  असे  आश्वासन एस आर बापू पाटील यांनी दिले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!