महाराष्ट्र
पंजाब येथील *त्या” नराधमांना भर चौकात फाशी द्या : रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गट शाखा उस्मानाबाद धाराशिवची मागणी

दर्पण न्यूज,(उस्मानाबाद धाराशिव :
संतोष खुने) :-
पंजाब येथील अमृतसर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना करणाऱ्याला भर चौकात फाशी शिक्षा देण्यात यावी ह्या मागणीसाठी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गट शाखा उस्मानाबाद धाराशिव यांनी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी राजाभाऊ ओव्हाळ तालुका अध्यक्ष भालचंद्र कटारे, सोमनाथ गायकवाड, उदय बनसोडे, विद्यानंद बनसोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते