आरोग्य व शिक्षण

आर.ए.पाटील पब्लिक स्कूलचा शंभर टक्के निकाल शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

बोरगांव प्रतिनिधी ;-
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सीबीएससी पॅटर्नची इंग्लिश मध्यम शिक्षण मिळावे व ग्रामीण भागातील मुले हे सर्वगुणसंपन्न व्हावेत यासाठी सहकार महर्षी रावसाहेब पाटील यांनी सुरुवात केलेल्या आर. ए. पाटील. पब्लिक स्कूल चा दहावीचा निकाल शंभर टक्के लागले असल्याची माहिती प्रिन्सिपल शमिका शहा यांनी सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी, दादांच्या नेतृत्वाखाली बोरगाव येथे पब्लिक स्कूलची स्थापना करण्यात आली. बोरगाव व परिसरातील विद्यार्थ्यांना सीबीएससी पॅटर्न चे शिक्षण मिळावे व येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी हे उच्चशिक्षित व्हावे हे ध्येय ठेवून आज या ठिकाणी शैक्षणिक कार्य करण्यात येत आहे. शाळा स्थापनेपासून सलग चार वर्षे दहावीचा निकाल हा शंभर टक्के लागलेला आहे .यावर्षी सुद्धा शंभर टक्के लागलेला असून कु.समीक्षा खोत प्रथम, कु.आदर्श बोरगावे द्वितीय, व हर्षिता पाटील हिने तृतीय क्रमांक मिळवलेला आहे .दहावी परीक्षेसाठी 27 विद्यार्थी परीक्षा दिली असून 27 पैकी 27 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.


या सर्वच विद्यार्थ्यांना संस्थापक रावसाहेब पाटील (दादा) ,शाळेचे चेअरमन उत्तम पाटील ,सेक्रेटरी अभिनंदन पाटील, संचालिका मीनाक्षी पाटील ,विनयश्री पाटील ,धनश्री पाटील ,शाळेचे सी.ई.ओ. बाळासाहेब हावले ,कोऑर्डिनेटर सुजित उळागड्डे यांच्यासह सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे शेवटी शहा यांनी सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!