
दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी( शिराज शिकलगार) :- सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा नगरपालिका हद्दीतील विटा मायणी रोड लागत सराफ पेठ आहे, या सराफ पेठेत संतत दुचाकी मोटरसायकलची व अन्य वाहनांची वर्दळ असते,तर सराफ पेठ म्हटल की नागरीकांचीही गर्दी दिसून येते,अशात विटा सराफ पेठेतील अत्यंत महत्त्वाचा संपर्क मार्ग सध्या मोठ्या प्रमाणात आता खड्डेमय झाला असून वाहनधारक विद्यार्थ्यांनी सर्वसामान्य नागरिकांना व अन्य नागरिकांना जीव मुठीत धरून या भागातून प्रवास करावा लागत आहे. एवढेच नव्हे तर पाऊस पडल्यानंतर या खड्ड्यामध्ये पाणी जलमय दिसून येत आहे. येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावरती या खड्ड्यातील पाणी एखादे वाहन आले की उडत असते. हेच खड्डे आता या रस्त्यावर सर्वत्र दिसून येत आहेत. चक्क काही नागरिकांनी या डांबरी रस्त्यावरील खड्डे सिमेंटने तात्पुरते भरून काढले आहेत, त्यामुळे संबंधित अधिकारी व प्रशासक अधिकारी यांनी लक्ष देऊन या सराफ पेठेतील खड्डे मुजवावे भरून घ्यावे अथवा रास्ता नवीन करून घ्यावा अशी मागणी विटेकर नागरिकांनी मध्ये प्रशासनाला व संबंधित अधिकाऱ्यांना विनंती केली आहे, त्यामुळे विट्यातील सराफ पेठेतील रस्ता झाला धोक्याचा अशी स्थिती दिसून येत आहे तेव्हा नागरिकांनी प्रशासनाला विनंती केली आहे की हा रस्ता दुरुस्त करून घ्यावा.
