दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार):–शिरसगाव सोनसळ येथील डॉ. पतंगराव श्रीपतराव कदम विद्यालय, शिरसगाव सोनसळ येथे क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिक क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठोंबरे सर होते.
वैष्णवी मांडके हिने नाना पाटील यांच्या क्रांतिकारी कार्याचा आणि “प्रति सरकार” च्या चळवळीतील योगदानाचा सविस्तर परिचय करून दिला. तिने विद्यार्थ्यांना त्यांचे धैर्य, त्याग आणि देशभक्तीचे विचार अंगीकारण्याचे आवाहन केले.याप्रसंगी इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा आपली मनोगते व्यक्त केली. शर्वरी पाटील, अनुराधा गोसावी, सानवी सकटे आणि संस्कृती कुंभार यांनी भाषणातून नाना पाटील यांच्या शौर्यगाथा आणि समाजसेवेचे कार्य उलगडून सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वराज मांडके याने केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संभव गोतपागर याने मानले. आरुषी घुटुकडे हिने संपूर्ण कार्यक्रमाची फोटोग्राफी केली.तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख शिंदे मॅडम यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
