दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी ( शिराज शिकलगार) :- शिरसगाव सोनसळ येथील डॉ. पतंगराव श्रीपतराव कदम विद्यालय, शिरसगाव सोनसळ येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि आदराने साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अदाटे सर होते. कार्यक्रमाची सुरुवात दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिशा शिवाजी घुटुकडे हिने केले. तिने लोकमान्य टिळकांचे “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे” हे ब्रीद आणि अण्णाभाऊ साठे यांचे कष्टकरी, वंचित जनतेसाठीचे साहित्य व शाहिरी यांचा परिचय करून दिला.
यावेळी ईश्वरी कदम, आदिती लावंड, सानवी सकटे, वैष्णवी मांडके, आसावरी मांडके, ज्ञानेश्वरी लावंड, अंतरा कदम, गायत्री पवार या विद्यार्थ्यांनी आपले विचार भाषणातून मांडले. विनायक सावंत याने अण्णाभाऊंचे सामाजिक जागृतीचे कार्य इंग्रजी मधून विशद केले.ठोंबरे सर व गुणवगोळ सर यांनी शिक्षक मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना दोन्ही महापुरुषांचे विचार जीवनात आचरणात आणण्याचे आवाहन केले.गुणवगोळ सरांनी स्मशानातील सोने ही कथा सांगून सर्वांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या शेवटी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ, शिरसगाव यांच्या वतीने उपस्थित सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांना जिलेबी वाटप करण्यात आले. तसेच शाळेचे शिपाई सकटे मामा यांनी दोन समई विद्यालयास भेट म्हणून दिल्या.सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख शिंदे मॅडम यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.संपूर्ण कार्यक्रमाची फोटोग्राफी आरुषी घुटुकडे हिने केली.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रेया अमोल भोसले हिने केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व इयत्ता 9 वी तील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
