दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार) -:डॉ. पतंगराव श्रीपतराव कदम विद्यालय, शिरसगाव-सोनसळ येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि महर्षी व्यास यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यानंतर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा श्रीफळ, गुलाब व पेन देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. इयत्ता 9 वी चा विद्यार्थी विनायक सावंत याने इंग्रजी भाषेतून ” द सिग्निफिकंस ऑफ गुरुपौर्णिमा ” या विषयावर दिलेले मनोगत सर्वांच्या विशेष पसंतीस पडले. तसेच शुभम सपकाळ,पारस मंडावले, प्रथमेश वाळींबे व सृष्टी वाईकर या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी ठोंबरे सर, शिकलगार मॅडम, शिंदे मॅडम आणि भिसे सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी गुरु-शिष्य परंपरेचे महत्व सांगितले.
कार्यक्रमात गुणवगोळ सर यांनी महर्षी व्यास यांच्या जीवनकार्याबद्दल आणि गुरुपौर्णिमेच्या महत्त्वाबद्दल माहिती दिली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समिती सदस्य संभाजी मांडके होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक अदाटे सर यांनी सर्व कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करून सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता 10वी ची विद्यार्थिनी उत्तरा शिंदे हिने अतिशय सुंदर रीतीने केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन पाटील मॅडम यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
