क्राईम
पीठ मळणी हंङीमध्ये हात सापङल्याने महिला जखमी : करवीर तालुक्यातील वङणगे येथील घटना

कोल्हापूरः अनिल पाटील
पीठ मळणी हंङीमध्ये काम करत आसताना हात मशिनमध्ये सापङून महीला जखमी झाली. अनिता विठ्ठल सूतार वय (46) वङणगे ता. करवीर ( लोहारगल्ली) असे त्यांचे नाव आहे.
त्यांचा वङणगे येथे पिठाची गिरण आहे. आज सकाळी 10 वाजण्याच्या सूमारास गिर्हाहिकाचे पीठ दळत असताना त्यांचा हात मशिनमध्ये सापङला. त्यानां जादा रक्तस्त्राव झाल्याने त्यानां पूढील उपचारासाठी सी. पी. आर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद करवीर पोलिसांत दाखल झाली आहे