पुणे येथील भाषा फाऊंडेशन , पुणेच्या “यक्षप्रश्न” प्रश्नमंजुषा स्पर्धेत इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल भिलवडी शाळेचं यश
यशस्वी विद्यार्थी ; शाळेचे लोकांमधून कौतुक

भिलवडी : भाषा फाऊंडेशन, पूणे तर्फे दरवर्षी **यक्षप्रश्न** ही प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन रविवार , दिनांक ०३/१२/२३ रोजी पुणे येथे करण्यात आले होते. यामध्ये भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूलने उज्ज्वल यश संपादन केले आहे.
यामध्ये भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल, या विद्यालयातील इ.७वी मधील कु. जान्हवी देशपांडे व कु. संस्कृती मदवाण्णा व ८ वी मधील चि.ओम तारे व चि .सिद्धेश पाटील असे एकूण चार विद्यार्थ्याची निवड करण्यात आली होती. “नद्यांची कहाणी ” हा या प्रश्न मंजुषेेचा विषय होता. या मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण 31 शाळा सहभागी झाल्या होत्या. त्यात शेवटच्या फेरीत एकूण 6 शाळा निवडल्या गेल्या.या मध्ये भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्रायमरी ॲड हायस्कूल भिलवडी या शाळेने चौथा क्रमांक मिळवला. यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या टोणपे तसेच सौ. किर्ती चोपडे , सौ . सीमा पाटील या शिक्षिकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. विश्वास चितळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मान पत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी संस्था सचिव श्री. हाके सर, सहसचिव श्री के. डी. पाटील सर, सौ. लीना चितळे, उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, व सर्व संचालकांनी
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. या यशस्वी विद्यार्थ्यांबरोबरच शाळेचे लोकांमधून कौतुक होत आहे.