कागल येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते अंगणवाडी मदतनिसांना नियुक्तीपत्रांचे वितरण

दर्पण न्यूज कागल प्रतिनिधी (मारुती डी कांबळे) :*
*कागलमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नवनियुक्त अंगणवाडी मदतनिसांना नियुक्तीपत्रांचे वितरण झाले. येथील शासकीय विश्रामगृहामध्ये बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती जयश्री नाईक उपस्थित होत्या.**एकात्मिक बाल विकास प्रकल्प -कागल अंतर्गत नवीन नियुक्ती झालेल्या नूतन मदतनीसांची नावे अशी, अंगणवाडी सेविका: निना भोसले – पिराचीवाडी, नेहा साळोखे – कासारी, स्नेहल गुरव – पिंपळगाव बुद्रुक, रूपाली कांबळे – अर्जुनी, स्नेहल शिंदे – बेलेवाडी मासा, सरिता कुंभार – सेनापती कापशी, नेहा तळेकर – सावर्डे खुर्द, रूपाली जाधव – मांगनुर, प्रतीक्षा जाधव – दौलतवाडी, मधुमणी कुंभार – बोरवडे, निशा कांबळे – बोरवडे, सुप्रिया परीट – हसूर बुद्रुक, हेमलता पोवार – बाळेघोल.*
*यावेळी पर्यवेक्षिका जयश्री सणगर, क्लार्क श्री जाधव, व आदी उपस्थित होते.*