आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
कागल येथील सिटी प्राईड हॉस्पिटलच्या सिटी स्कॅन सेंटरचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे) :-कागल शहरातील सिटी प्राईड हॉस्पिटलचे डॉ. तुषार भोसले यांनी नव्याने सुरू केलेल्या सिटी स्कॅन सेंटरचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैयासाहेब माने, श्रीनाथ समूहाचे चंद्रकांत गवळी, माजी उपनगराध्यक्ष बाबासाहेब नाईक, कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय चितारी, विवेक लोटे, ॲड. संग्राम गुरव, सम्राट सनगर, यांच्यासह मान्यवर व हॉस्पिटलचे डॉक्टर व स्टाफ उपस्थित होते.