माजी मंत्री हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

कोल्हापूरः अनिल पाटील
:खासगी साखर कारखान्याच्या शेअर्स कथित अपहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर छापे टाकले होते. याप्रकरणी आपल्याला अटक होईल, या शक्यतेने हसन मुश्रीफ यांनी विशेष प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रीग ॲक्ट न्यायालयात अटकपूर्वक जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्वक अर्ज आज ना मंजूर केला. यामुळे खाजगी संताजी घोरपडे साखर कारखाना तसेच हरळी येथील गडहिंग्लज साखर कारखाना चालविण्यास घेतलेल्या ब्रिस्क कंपनीच्या कथित गैर व्यवहार प्रकरणी मनी लॉन्ड्रीग झाल्याचा संशय आहे. याप्रकरणी मुश्रीफ, त्यांची तीन मुले, जावई व निकटवर्तीय यांच्यावर या आधीच ईडी व इन्कम टॅक्स आदी केंद्रीय तपास यंत्रणांनी छापे टाकून तपासणी केली आहे. अलीकडेच मुश्रीफ यांचे कागल येथील निवासस्थान व अन्य व्यावसायिक ठिकाणावर ईडीने छापे टाकून संशयास्पद व्यवहारा संदर्भातील कागदपत्रे जप्त केली होती. त्यानंतर अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी हसन मुश्रीफ यांनी विशेष पीएमएलए न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. त्यांच्या अर्जावर निर्णय होईपर्यंत न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिले होते.
दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद झाला होता .मुश्रीफ यांच्या वतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा व ईडीतर्फे हितेन वेणेगावकर यांनी युक्तिवाद केला होता .न्यायालयाने अकरा एप्रिलपर्यंत निकाल राखून ठेवला होता . त्याचा निर्णय न्यायमूर्ती देशपांडे यांनी देताना हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.