भिलवडी पंचशिलनगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम ; १२ रोजी भीम-बुद्ध गीतांचा बहारदार कार्यक्रम

भिलवडी:- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव भिलवडी यांच्यावतीने भिलवडी पंचशिलनगर येथे सर्व धर्म बांधवांना सहभागी करीत विविध सामाजिक, शैक्षणिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. बुधवार दिनांक १२ रोजी भीम-बुद्ध गीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजित केला आहे.
नेहमीच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव भिलवडी विविध सामाजिक उपक्रम राबवित भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतात. याही वर्षी असे अनेक उपक्रम राबविले आहेत. यात प्रामुख्याने मंगळवार दिनांक ११ रोजी विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य जोतिराव फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा आयोजित केली आहे.निबंधाचे विषय खालील प्रमाणे..
१. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर
२. क्रांती सूर्य महात्मा जोतिराव फुले*वयोगट* : ३ री ते १२ वी
*वेळ* : दु. ४:०० ते ५:३०
*वार* .- मंगळवार
*दि.* ११/०४/२०२३
*स्थळ -: पंचशिलनगर, भिलवडी.**या निबंध स्पर्धेतील पहिले तीन क्रमांक आणि उत्तेजनार्थ दोन विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहे. बुधवार दिनांक १२ रोजी रात्री ८ वाजता महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे ५०० पेक्षा जास्त कार्यक्रम सादर केलेले भीम-बुध्द गीतांचा बहारदार कार्यक्रम भीमराज गीत प्रबोधन मंच आटपाडी यांचा आहे. गुरूवार दिनांक १३ रोजी सकाळी नेत्र तपासणी शिबीर, लहान मुलांचा कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजता महिला -मुलींचा विविध गुणदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रात्री १२ वाजता फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे.तसेच शुक्रवार दिनांक १४ रोजी पहाटे अंकलखोप येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीचे दर्शन, अभिवादन करण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, झेंडा वंदन कार्यक्रम होईल. त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांचा, उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. सायंकाळी ४ वाजता पंचशिलनगर येथून विविध पारंपारिक वाद्यांच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी करीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भिलवडी गावातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक निघणार आहे. यामध्ये , ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, युवतींचा मोठा सहभाग आहे. शासनाच्या नियमांचे पालन करीत अत्यंत शांततेत मिरवणूक निघणार आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे अत्यंत नेटके नियोजन करण्यात आले आहे.
या डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मध्ये सर्व लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.