पाटाकडील तालीम मंडळ-अ संघाचा अंतिम फेरीत प्रवेश : चंद्रकांत चषक 2023 फुटबाॅल स्पर्धा

कोल्हापूरःः अनिल पाटील
*”चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेत स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामना आज पाटाकडील तालीम मंडळ-अ संघ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यामध्ये खेळला गेला. या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ-अ संघाने बालगोपाल तालीम मंडळचा ४-३ पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.*
*श्री नेताजी तरुण मंडळ आयोजित “चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील सामन्याची सुरवात अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, डॉ.भरत कोटकर, डॉ.रेश्मा मोमीन, महानगरपालिकेचे जल अभियंता नेत्रदीप सरनोबत, इस्टेट अधिकारी सचिन जाधव, उपशहर अभियंता रमेश कांबळे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, अनिल चव्हाण,संजय कुपले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राजेंद्र वारके, आशिष पाटील, गणपतसिंह देवल यांच्या हस्ते करण्यात आली.*
*पाटाकडील तालीम मंडळ-अ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ सामन्याच्या पूर्वार्धात बालगोपालच्या व्हिक्टर याने साहिल दातवे याच्या पासवर गोल केला. त्यानंतर पाटाकडील तालीम मंडळ-अ संघाच्या प्रतीक बदामे याने गोल केला. मध्यंत्तरापर्यंत पाटाकडील आणि बालगोपाल १-१ असा बरोबरीत सामना झाला. पूर्णवेळेत सामना १-१ असा बरोबरीत राहिला. यामुळे सामन्याचा निकाल ट्राय ब्रेकर वर घेण्यात आला. टाय ब्रेकरवर पीटीएमने बालगोपालचा ४-३ पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.*
*सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून प्रथमेश हेरेकर यांची निवड झाली. कोल्हापूर पोलीस फुटबॉल संघाचे माजी नामवंत खेळाडू सुदेश मगदूम, नूरमहम्मद देसाई यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.*
*या सामन्याच्या वेळी महिला व पुरुष प्रेक्षकांच्यासाठी लकी ड्रॉ काढण्यात आला. महानगरपालिकेचे जल अभियंता नेत्रदीप सरनोबत, डॉ.भरत कोटकर, संजय सरनाईक, सचिन जाधव, नेताजी तरुण मंडळाचे अध्यक्ष राजू साळोखे, आशिष पवार यांच्या हस्ते भाग्यवान प्रेक्षकांची कुपन काढण्यात आली.महेश इंगवले (संध्यामठ गल्ली), अनिता मोरे (मंगळवार पेठ) यांना गिफ्ट कुपन देण्यात आले.*
*चंद्रकांत चषक 2023 चा अंतिम फायनल सामना शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ-अ यांच्यामध्ये शनिवार दि.१५ एप्रिल २०२३ रोजी सायं. ४:०० वा.खेळवला जाणार आहे.स्पर्धेतील विजेते व उपविजेत्यांना मिळणार Copa America Cup सारखा चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेची अधिक तिकिट विक्री उद्या देखील सुरू राहणार आहे.*