मिरज येथे उद्योगपती सी आर सांगलीकर फौंडेशन, अर्थव चॅरिटेबल ट्रस्ट गुगवाडच्यावतीने भुपाल कांबळे यांना अभिवादन..!

सांगली : मिरज येथे उद्योगपती सी आर सांगलीकर फौंडेशन, अर्थव चॅरिटेबल ट्रस्ट गुगवाडच्यावतीने धम्माच्या कार्यासाठी झटणारे बुध्दवासी भुपाल कांबळे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उद्योगपती सी आर सांगलीकर फाउंडेशन, अथर्व चॅरिटेबल ट्रस्ट गुगवाड च्या वतीने प्रा. संजीव साबळे, प्रा. अशोक भटकर, आनंदराव कांबळे यांनी बुध्दवासी भोपाल कांबळे यांच्या कार्याची माहिती सांगून आदरांजली वाहिली.
मिरज येथे भुपाल गणपती कांबळे बापू यांचा जलदानविधी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नेहमीच भुपाल गणपती कांबळे यांनी उद्योगपती सी आर सांगलीकर यांच्या धम्माच्या कार्यक्रमात पुढाकाराने भाग घेत असत. उद्योगपती सी आर सांगलीकर यांच्या धम्माच्या प्रचार आणि प्रसाराला बापूंनी सहकार्य केले होते. हे कार्य उद्योगपती सी आर सांगलीकर आणि धम्मभूमी अथर्व चॅरिटेबल ट्रस्ट गुगवाडच्या स्मरणात चिरकाल राहणारे आहे.
मिरज येथील जलदानविधी कार्यक्रमास
उद्योगपती सी आर सांगलीकर फौंडेशन मिरज, धम्मभूमी अथर्व चॅरिटेबल ट्रस्ट गुगवाडचे प्रतिनिधी म्हणून आनंदराव कांबळे, प्रा संजीव कांबळे, प्रा अरुण कांबळे, प्रा. अशोक भटकर, प्रदीप कांबळे, भारत कदम, महेश शिवशरण, अविनाश जाधव आदी उपस्थित होते.