महाराष्ट्र

सांगली येथील उद्योगपती सी आर सांगलीकर फौंडेशन आणि अथर्व चॅरिटेबल ट्रस्ट गुगवाडच्यावतीने जयसिंगपूरचे डॉ अतिक पटेल यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

पटेल यांच्याकडून उद्योगपती सी आर सांगलीकर यांच्या कार्याचे कौतुक

 

सांगली : नेहमीच सामाजिक कार्याचे आणि उत्तुंग भरारी घेणाऱ्यांच्या कार्याला शाब्बासकीची थाप देण्यास कधीही मागे न पडणारे एक पाऊल नेहमीच पुढे असणारे उद्योगपती सी आर सांगलीकर फाउंडेशन सांगली आणि अथर्व चॅरिटेबल ट्रस्ट, धम्मभूमी गुगवाडच्यावतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मदत करणाऱ्या कुटुंबातील जयसिंगपूर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि वैद्यकीय क्षेत्रात नावलौकिक कमावलेले डॉक्टर अतिक पटेल यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

तसे पाहता डॉक्टर अतिक पटेल हे जग्नेश बी पटेल यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत. सन 1928 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मुक्काम पंधरा दिवस पटेल वाडा निवासस्थानी औरवाड येथे होता. जिग्नेश बी पटेल भाभी यांनी जवळपास पंधरा दिवस डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना रोज स्वयंपाक करून जेवू घातल्याच्या साक्षीदार आहेत. हे त्यांचं भाग्यचं म्हणावं लागेल.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची केस चिकोडी न्यायालयात होती. बाबासाहेबांची वकील झाल्यानंतर ची पहिलीच केस होती. या केस दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खडतर प्रवास केला. असे म्हणतात की बाबासाहेब रोज सायकलीने औरवाड ते चिकोडी असा प्रवास करीत होते.
पटेल वाड्याला लागलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पाऊल हे पटेल समाज आजही स्वतःला भाग्यवान समजतात. आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक वाटचालीचा वसाही ते जपत आहेत.
डॉक्टर अतिक पटेल यांनी डॉक्टरी पेशाबरोबर सामाजिक चळवळीचे भान ठेवले आहे. पटेल हे सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय भाग घेत असतात.

दरम्यान, उद्योगपती सी आर सांगलीकर फाउंडेशनच्या वतीने सत्कार केल्यानंतर डॉक्टर अतिक पटेल म्हणाले की, सामान्य कुटुंबात जन्मलेले जत सारख्या ग्रामीण भागातील उद्योगपती सी आर सांगलीकर यांनी आपल्या उद्योग क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे. इतका मोठा श्रीमंत माणूस आजही जमिनीवर आहे हे आम्ही भाग्याचे समजतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा जपत धम्माचे कार्य पुढे घेऊन जाणारे उद्योगपती सी आर सांगलीकर यांचे कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे. आज रोजी ही उद्योगपती सी आर सांगलीकर यांनी तळागाळातील लोकांना मदत केली आणि करीत आहेत. सामाजिक कार्यासाठी नेहमीच वाहून घेतात हे कार्य कौतुकास्पद आहे, या त्यांच्या कार्याला आम्ही पटेल कु़ंटुब भारावून गेलो आहोत. धम्माच्या कार्यासाठी जत गुगवाड येथे स्व कष्टातून आठ कोटी रुपये खर्च करून धम्मभूमीची उभारणी केली. ही धम्मभूमी देशभरासह विदेशातील नागरिकांना प्रेरणा देणारी ठरणारी आहे, उद्योगपती सांगलीकर यांचा आदर्श घेऊ, असेही मोठ्या मनाने पटेल यांनी भावना व्यक्त केल्या. डॉ पटेल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना उद्योगपती सी आर सांगलीकर फाउंडेशनचे मा आनंदराव कांबळे, मा प्रा अरुण कांबळे,मा. अविनाश जाधव उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!