शिरोळ नगरपरिषदेचा कनिष्ठ अभियंता संकेत हंगरगेकरसह तिघांना एक लाख रूपयांची लाच स्वीकारताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने केले जेरबंद

कोल्हापूर ःअनिल पाटील
तक्रारदार यांचे बांधकाम परवाना फाईल तपासून पूढे पाटविण्याकरिता संकेत हणमंत हंगरगेकर वय 28 कनिष्ठ अभियंता ‘शिरोळ नगरपरिषद’ सद्या जयसिंगपूर ता. शिरोळ ‘मूळ उस्मानाबाद व सचीन तूकाराम सावंत ‘लिपीक शिरोळ नगरपरिषद. रा. शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांनी तक्रारदारयांच्याकङे 1 लाख रूपये लाचेची मागणी केली तसेच अभिजीत मारूती हराळे वय 33 मूख्याधिकारी शिरोळ नगरपरिषद शिरोळ ‘मूळ गाव भिलवङी तालूका पलूस जिल्हा सांगली यांनी तक्रारदार यांची फाईल मंजूर करून बांधकाम परवाना देण्यासाठी 75 हजार लाचेची मागणी करून ही लाच अभिजीत हराळे व संकेत हंगरगेकर यानां स्विकारण्यास सांगितली. सचीन सावंत यांनी अमित तानाजी संकपाळ खासगी ईसम रा. शिरोळ यानां स्विकारण्यास सांगितली. ही लाच स्विकारतानां लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकङले.
ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक नितीन कुंभार””संजीव बंबरगेकर”पो.हे.काॅ. विकास माने ‘मयूर देसाई आदीनी केली.