गाय व म्हैस वर्गीय प्राण्याचे शर्यत, प्रदर्शन, जत्रा तसेच जनावरांचे बाजार भरविणेस सशर्त परवानगी : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली : कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी उपबाजार आवार, करगणी यांच्याकडील प्राप्त अर्जानूसार आटपाडी तालुक्यातील करणगी येथे महाशिवरात्री निमित्त जनावरे बाजार भरविणेस परवानगी मिळणेस उपविभागीय विटा यांना विनंती केली आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आटपाडी तालुक्यामध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव कमी झाल्याची खात्री झाल्याने खालील अटी व शर्तीस अधिन राहुन गाय व म्हैस वर्गीय प्राण्याचे शर्यत, प्रदर्शन, जत्रा तसेच जनावरांचे बाजार भरविणेस परवानगी दिली आहे.
अटी व शर्ती पुढीलप्रमाणे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनूसार जिल्ह्यातंर्गत वाहतूक करावयाच्या गुंराचे लम्पी चर्म रोगाकरीता 28 दिवसापूर्वी प्रतिबंधक लसीकरण झालेले असणे बंधनकारक आहे. वाहतूक करावयाच्या गुरांची ओळख पटविण्यासाठी कानात टॅग नंबर असणे तसेच इनाफ पोर्टलवर नोंदणी असणे बंधनकारक आहे. गुरांची वाहतुक करताना विहित प्रपत्रामधील आरोग्य दाखला तसेच स्वास्थ प्रमाणपत्र सोबत बाळगणे बंधनकारक आहे. जनावरांचे बाजार भरण्यापूर्वी व नंतर संपूर्ण परिसरात तसेच शर्यतीच्या ठिकाणी जंतू नाशक व किटकनाशक औषधाची फवारणी आयोजकांनी करणे बंधनकारक आहे. जनावरांचे बाजार परिसरात फक्त कानात eartag मारलेल्या गाय व म्हैस वर्गातील जनावरांनाच प्रवेश देणे बंधनकारक आहे. व सदर आवक व जावक झालेल्या जनावरांची यादी संबंधित पशुपालकांच्या नावसहीत (टॅग नंबरसह) संबंधित पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांना त्याच दिवशी देणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे बाजाराच्या ठिकाणी दोन जनावरामध्ये किमान 10 फुटांचे अंतर ठेवणे बंधनकारक आहे. जनावरांचा बाजार, शर्यत/प्रदर्शन भरविताना आवश्यक त्या सर्व परवानग्या आयोजक यांनी घेणे बंधनकारक आहे. पशुवैद्यकीय अधिकारी/पशुवैद्यकीय व्यवसायिक यांचे पथक प्रदर्शन कालावधीमध्ये प्रदर्शन ठिकाणी पुर्णवेळ कार्यरत ठेवणे आयोजक यांचेवर बंधनकारक असेल. संक्रमित असलेल्या/संक्रमित नसलेल्या क्षेत्रातून गुरांची/म्हैशीची वाहतूक करण्यासाठी आवश्यक ते आरोग्य प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य शासनाच्या/जिल्हा परिषदेकडील पशुसंबर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी गट अ पेक्षा कमी दर्जाचा नसलेल्या अधिकारी यांना सक्षम अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे. सदर आदेशाची अंमलबजावणी पोलिस प्रशासन, जिल्हा पशुसंवर्धन, उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, सहकरी संस्था व सर्व अनुषंगिक प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी काटेकोरपणे करावी असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले आहेत.