कोल्हापूरःअनिल पाटील
कोल्हापूर शहरातील रस्त्यांची कधी नव्हे ती डागडुजी करण्याची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. दूर्लक्षीत व कधी सफाई न झालेले फुटपाथ देखील साफ केले जात आहेत. रस्ते दुभाजकांची रंगरंगोटी तसेच भिंती रंगवल्या जात आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर येत असल्याने शहराचे सौंदर्य खुलले आहे.
गृहमंत्री अमित शाह हे कोल्हापूरचे जावई देखील आहेत. शहर चकचकीत होण्यासाठी कोल्हापूरचे जावई गृहमंत्री अमित शाह यांनी वरचेवर यावं जेणेकरून सुस्त झालेली महापालिका कामाला लागेल असे आवाहन ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी केले आहे.