
दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार):–
विटा नगरपरिषद विटा येथे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व, साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनी अभिवादन करण्यात आले .
यावेळी नगराध्यक्षा सौ. काजलकाकी म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोलदादा बाबर,सर्व नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्षा सौ. काजल म्हेत्रे आपल्या मनोगतात म्हणाल्या की लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 साली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. आण्णाभाऊ हे अवघे दीड दिवस शाळेत गेले नंतर वर्णभेदाद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते, सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव होता. दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. असे प्रतिपादन केले.
यावेळी विटा नगरपरिषदेचे सर्व पदाधिकारी,अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
