
दर्पण न्यूज मिरज/सांगली : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी वाटेगाव येथील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, वाळवा उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, समाज कल्याण सांगली कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत आदी उपस्थित होते.
दरम्यान आमदार सत्यजित देशमुख यांनीही साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
