ताज्या घडामोडी

विशिष्ट सणासाठी ध्वनीची विहीत मर्यादा राखून ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास सवलत

 

        सांगली  : सण, उत्सव, समारंभासाठी शासनाने ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 नुसार विशिष्ट सण उत्सवासाठी ध्वनीची विहीत मर्यादा राखून कार्यक्रमासाठी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सवलत देण्याकामी जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत केले आहे.  त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी पुढील सणांसाठी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सवलत दिली आहे.

            ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सवलत देण्यात आलेले सण,  दिवसांची संख्या व तारीख पुढीलप्रमाणे. शिवजयंती (शासकीय) – 01 दिवस, 19 फेब्रुवारी 2023, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती – 01 दिवस, 14 एप्रिल 2023, 1 मे महाराष्ट्र दिन – 01 दिवस, 01 मे 2023, गणपती उत्सव – 5 दिवस, गणेश चतुर्थी- 19 सप्टेंबर 2023, पाचवा दिवस – 23 सप्टेंबर 2023, सातवा दिवस – 25 सप्टेंबर 2023, नववा दिवस – 27 सप्टेंबर 2023 व  अनंत चतुर्दशी – 28 सप्टेंबर 2023, ईद-ए-मिलाद – 01 दिवस, 28 सप्टेंबर 2023, नवरात्री उत्सव-02 दिवस, अष्टमी – 22 ऑक्टोबर 2023 व नवमी – 23 ऑक्टोबर 2023, दिपावली -01 दिवस (लक्ष्मीपूजन), 12 नोव्हेंबर 2023, ख्रिसमस – 01 दिवस, 25 डिसेंबर 2023 व 31 डिसेंबर 2023 – 01 दिवस.

            ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास देण्यात आलेली सवलत घोषीत शांतता क्षेत्रासाठी लागू असणार नाही. घोषीत शांतता क्षेत्रामध्ये ध्वनी प्रदुषणाची अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिका हद्दीमध्ये आयुक्त महानगरपालिका, उप प्रादेशिक अधिकारी, जिल्हा प्रदुषण मंडळ सांगली व पोलीस अधीक्षक सांगली आणि ग्रामीण व शहरी भागामध्ये उप प्रादेशिक अधिकारी, जिल्हा प्रदुषण मंडळ सांगली व पोलीस अधीक्षक सांगली यांना प्राधिकृत केल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!