दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :- येडशी (ता. धाराशिव) | हजरत जमादार बाबा उर्स समिती जाहीर
येडशी येथील ग्रामदैवत हजरत जमादार बाबा यांच्या उर्स समितीची नुकतीच निवड करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी रफीक पटेल यांची निवड करण्यात आली असून, उपाध्यक्षपदी आलम सय्यद व समीर पटेल, सचिवपदी जफर पटेल, सहसचिवपदी इकबाल शेख व शारूख बागवान, कोषाध्यक्षपदी मोहसिन शेख, तर खजिनदारपदी हैदर पटेल व आसिफ तांबोळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावर्षीचा हजरत जमादार बाबा उर्स 31 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 या कालावधीत मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाचे वेळापत्रक:
31 जुलै – संदल मिरवणूक
1 ऑगस्ट – कव्वाली, चिरागा व महाप्रसाद
2 ऑगस्ट – जियारत
उर्सानिमित्त सर्व भाविकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उर्स समितीच्या वतीने करण्यात आले आहे.