पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा

दर्पण न्यूज मिरज/सांगली :- : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे शुक्रवार, दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता कोल्हापूर येथून भिलवडी, ता. पलूस, जि. सांगलीकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता भिलवडी शिक्षण संस्थेचे बाबासाहेब चितळे महाविद्यालय भिलवडी येथे आगमन व कौशल्य विकास केंद्र उद्घाटन समारंभास उपस्थिती. सकाळी 11.30 वाजता उरूण ईश्वरपूर ता. वाळवाकडे प्रयाण. दुपारी 12.15 वाजता उरूण ईश्वरपूर येथे आगमन व राखीव. दुपारी 1.45 वाजता सांगलीकडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता दिपायन बॅंक्वेट हॉल, जुने आरटीओ ऑफीस समोर, माधवनगर रोड सांगली येथे आगमन व उत्पादक खरेदीदार संमेलन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3.15 वाजता शासकीय विश्रामगृह मिरजकडे प्रयाण. दुपारी 3.30 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथे आगमन व राखीव. सायंकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथून हनुमाननगर, सांगलीकडे प्रयाण. सायंकाळी 6.20 वाजता हनुमानगर सांगली येथे आगमन व सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या भाजी मंडईच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. सायंकाळी 7 वाजता काळीखण, पुष्कराज चौकाजवळ सांगली येथे आगमन व सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमार्फत केलेल्या काळीखण सुशोभीकरण कामाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 7.45 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथे आगमन व राखीव. रात्री 9.20 वाजता मिरज रेल्वेस्थानकाकडे प्रयाण. रात्री 9.30 वाजता मिरज रेल्वेस्थानक येथे आगमन व राखीव. रात्री 9.50 वाजता मिरज रेल्वेस्थानक येथून महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.


