अमृत दुर्गोत्सव २०२५’ला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा बहुमान
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी संस्थेच्या कार्याची जागतिक स्तरावर दखल

दर्पण न्यूज मिरज/सांगली :- : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या कार्याची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली आहे. संस्थेच्या ‘अमृत दुर्गोत्सव २०२५’ या उपक्रमाने ‘मानवी हातांनी तयार केलेल्या प्रतिकृतींचा सर्वात मोठा डिजिटल फोटो अल्बम’ या श्रेणीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविला आहे. या विक्रमाचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र देऊन अमृत संस्थेला सन्मानित करण्यात आले. या उत्सवात सक्रिय सहभाग घेऊन सहकार्य केल्याबद्दल अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी आभार मानले आहेत.
‘अमृत दुर्गोत्सव २०२५’ या उपक्रमाद्वारे युनेस्को मान्यताप्राप्त १२ ऐतिहासिक गड-दुर्गांच्या प्रतिकृतींसोबत सेल्फी काढून ते दुर्गोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले होते. महाराष्ट्रासह देशातील विविध राज्ये आणि इतर देशातील नागरिकांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे.


