ग्रामीणताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक
सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे अभिजात मराठी भाषा दिवस साजरा

दर्पण न्यूज भिलवडी :-
सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे 3 ऑक्टोबर 2025 रोजी अभिजात मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मराठीच्या समृद्धीसाठी या विषयावर चर्चासत्र संपन्न झाली चर्चा सत्राच्या अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष डी आर कदम सर होते यावेळी सुप्रसिद्ध साहित्यिक कार्यवाह सुभाष कवडे यांनी मराठी बोली भाषेतील ग्रामीण शब्द जतन केले पाहिजेत आणि मराठीच्या समृद्धीसाठी त्या शब्दांचा संग्रह करून ते शब्द वापरात आल्यास मराठी अधिक समृद्ध होईल अशा प्रकारचे विचार व्यक्त केले. यावेळी विश्वस्त जी.जी. पाटील संचालक केळकर सर. प्राध्यापक आर.डी. पाटील सर प्रथमेश वावरे मयुरी नलवडे विद्या निकम यांच्यासह पत्रकार वाचक उपस्थित होते.