सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांचा वाचन कट्टा उत्साहात

दर्पण न्यूज भिलवडी :- सांगली जिल्हा सांगली पलूस तालुक्यातील सार्वजनिक वाचनालय भिलवडी
यांचे वतीने दर महिन्याच्या एक तारखेस संपन्न होणारा वाचन कट्टा उपक्रम 1 ऑक्टोबर रोजी वाचनालयाच्या सभागृहात संपन्न झाला .हा वाचन कट्टा 70 वा वाचन कट्टा होता. या वाचन कट्ट्यावरती काकासाहेब चितळे – सहवेदनेतून समृद्धीकडे या पुस्तकावर चर्चासत्र संपन्न झाले. वाचन कट्टा उपक्रमाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ वाचक बालसाहित्यिक श्री.ह.रा .जोशी सर होते.यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष डी आर कदम विश्वस्त जी.जी.पाटील कार्यवाह सुभाष कवडे आदी उपस्थित होते.या वाचन कट्ट्यासाठी अध्यक्ष गिरीश चितळे ,श्रीमती सुनिता चितळे वहिनी ,श्री मकरंद चितळे सौ.लीना चितळे वहिनी सौ.भक्ती चितळे वाचनालयाचे सर्व संचालक वाचक व सर्व सेवक बहुसंख्येने उपस्थित होते. या वाचन कट्ट्यावर श्री बी.डी.पाटील,ग्रंथपाल मयुरी नलवडे,शरद जाधव ,डी आर कदम सर ,सतीश तोडकर हनुमंतराव शिंदे ,पुरुषोत्तम जोशी, प्रथमेश वावरे, जयदीप पाटील,शशिकांत कुलकर्णी ,स्नेहा शांतिनाथ शेडबाळकर ,हकीम तांबोळी, जयंत केळकर ,सौ उमा कोरे मॅडम सौ उर्मिला डिसले वहिनी सुबोध वाळवेकर यांच्यासह अनेकांनी आपली मते मांडली. त्यामध्ये श्री रमेश चोपडे सर श्रीआर डी पाटील सर यांचाही समावेश होता काकासाहेब चितळे यांचे प्रसिद्ध झालेले चरित्र 🌸काकासाहेब चितळे- सहवेदनेतून समृद्धीकडे 🌸
या पुस्तकातील मूल्ये काकासाहेबांच्या आठवणी काकासाहेबांचे चरित्र काकासाहेबांनी केलेले सामाजिक कार्य आधी विविध विषयांना चर्चेमध्ये स्पर्श करण्यात आला.आणि हे पुस्तक वाचणे म्हणजे वाचकाने स्वतःला समृद्ध करणे.संवेदनशील बनवणे होय अशा प्रकारचा चर्चासत्रात महत्त्वाचा सूर निघाला.वसुंधरा काशीकर यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे.कार्यक्रमाचे संयोजन वाचन कट्टा संयोजक व कार्यवाह सुभाष कवडे यांनी मयुरी नलवडे सौ विद्या निकम यांच्या समवेत केले.