सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी

दर्पण न्यूज भिलवडी :-
सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे दोन ऑक्टोबर 2025 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी जयंती माजी पंतप्रधान स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांची जयंती तसेच ग्रंथ पूजन सरस्वती पूजन आणि दिवाळी अंक उपक्रमाचा शुभारंभ असे विविध उपक्रम साजरी करण्यात आली. भिलवडीतील नामवंत धन्वंतरी डॉक्टर सुमित साळुंखे आणि सौभाग्यवती सायली साळुंखे यांचे शुभ हस्ते प्रतिमेस पुष्पहार घालून वाचनालयाच्या वतीने अभिवादन करण्यात आले यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष डी आर कदम विश्वस्त दीदी पाटील कार्यकारणी सदस्य जयंत केळकर बाळासाहेब पाटील सर्ववाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत प्रास्ताविक कार्यवाहक सुभाष कवडे यांनी करून सर्वांचे विषयी कृतज्ञता व्यक्त केली. पहिल्याच दिवशी दिवाळी अंक उपक्रम योजनेचा शुभारंभ झाला आणि दहा नवे सभासद दिवाळी अंकासाठी नोंदवले गेले यावर्षी 100 रुपयात 100 दिवाळी अंक वाचा हा उपक्रम प्रतिवर्षीप्रमाणे ही घेण्यात येणार आहे व उपक्रमाचे संयोजन ग्रंथपाल मयुरी नलवडे प्रमुख लेखनिक विद्यानिकम माधव काटीकर यांच्यासह अन्य सदस्यांनी केले.