पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा

सांगली : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे शनिवार, दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 5.35 वाजता मिरज रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय विश्रामगृह मिरजकडे प्रयाण. सकाळी 5.45 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथे आगमन व राखीव. सकाळी 7.45 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथून कुपवाडकडे प्रयाण. सकाळी 8 वाजता झिल इंटरनॅशनल स्कूल कुपवाड येथे आगमन व झिल इंटरनॅशनल स्कूल कुपवाड येथे नशामुक्त अभियान प्रतिज्ञा कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 8.30 वाजता कुपवाड येथून जुनेखेड ता. वाळवाकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता जुनेखेड येथे आगमन जुनेखेड येथील पूर परिस्थिती पाहणी. सकाळी 10.15 वाजता जुनेखेड येथून पेठ, ता. वाळवाकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता इंदिरा पॅलेस वाघवाडी फाटा पेठ येथे आगमन व शेतकरी परिसंवाद कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11.15 वाजता पेठ येथून औदुंबर ता. पलूसकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता औदुंबर येथे आगमन व श्री दत्त मंदिर औदुंबर येथील पूर परिस्थिती पाहणी. दुपारी 12.30 वाजता मौलानानगर, भिलवडी ता. पलूस येथील पूर परिस्थिती पाहणी. दुपारी 1 वाजता सेकंडरी हायस्कूल भिलवडी ता. पलूस येथील निवारा केंद्रास भेट व आढावा. दुपारी 1.30 वाजता भिलवडी येथून सांगलीकडे प्रयाण. दुपारी 2 वाजता आगमन व सुर्यवंशी प्लॉट, कर्नाळ रोड, सांगली येथील पूर परिस्थिती पाहणी. दुपारी 2.30 वाजता आगमन व सहकार भवन, मार्केट यार्ड सांगली येथील निवारा केंद्रास भेट आढावा. दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आगमन व आपत्ती व्यवस्थापन (पूर सदृष्य परिस्थिती) आढावा बैठकीस उपस्थिती. सायंकाळी 5 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज येथे आगमन व अमली पदार्थ व्यसनमुक्ती केंद्राचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सोयीनुसार शासकीय विश्रामगृह मिरज येथे आगमन व राखीव. रात्री 7.45 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय समोरील मैदान मिरज येथे आगमन व दहीहंडी 2025 सोहळ्यास उपस्थिती. सोयीनुसार मिरज येथून कोल्हापूरकडे प्रयाण.