पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा रविवारी सांगली जिल्हा दौरा

दर्पण न्यूज मिरज /सांगली : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे रविवार, दि. 8 मार्च 2026 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार, दि. 8 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता सांगली जिल्हा प्रशासनाच्या कन्या सबलीकरण (सांगली पॅटर्न) उपक्रमांतर्गत मोफत सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण कार्यक्रम यलो बेल्ट ग्रेड प्रमाणपत्र वितरण समारंभास उपस्थिती, स्थळ – दिपायन बॅक्वेट हॉल, माधवनगर सांगली. सकाळी 11 वाजता माधवनगर येथून वाहनाने एम.आय.डी.सी कुपवाडकडे प्रयाण. सकाळी 11:15 वाजता लट्टे एज्युकेशन सोसायटीचे पॉलिटेक्निक सांगली, P-41, एम.आय.डी.सी.कुपवाड येथे आगमन व जागतिक महिला दिन औचित्यानिमित्त नारी शक्ती संवाद कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 12:10 वाजता भानू तालीम शेजारी ब्राह्मणपुरी मिरज येथे आगमन व श्री हेमंत महाबळ यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट, दुपारी 12:20 वाजता ब्राह्मणपुरी मिरज येथून हरिपूर रोड, सांगली कडे प्रयाण. दुपारी 12:35 वाजता रॉयल पॅलेस हरिपूर रोड, बागेतल्या गणपती मंदिराजवळ, सांगली येथे आगमन व श्री. सागर व सौ. पूजा चाफळकर यांचे सुपुत्र चि. वेद यांच्या व्रतबंध सोहळ्यास उपस्थिती, दुपारी 1 वाजता सांगली येथून पुणेकडे प्रयाण.



