कबनूर येथील ग्रामविकास अधिकारी गणपत धनाजी आदलींग याला 9 हजार रूपयाची लाच घेतानां लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकङले

कोल्हापूरः अनिल पाटील
तक्रारदार हे कॉन्ट्रॅक्टर असुन त्यांनी मौजे कबनुर,ता.हातकणंगले गावातील वॉर्ड नंबर 2 मधील वाढीव पाईप लाईन बसवणेसाठीच्या कामाची नियमाप्रमाणे निविदा भरलेली आहे. ही भरलेले निविधा प्रमाणे कामाबाबत विचारणा करणेसाठी तक्रारदार ग्रामविकास अधिकारी आदलिंग यांना भेटले असता आदलींग यांनी तक्रारदार यांना कामाची वर्क ऑर्डर देणेकरिता तक्रारदार यांच्याकडे 9000/-₹ ची मागणी केली होती.मागणी केलेप्रमाणे ग्रामविकास अधिकारी आदलिंग वय 57 कबनूर ता. हातकणंगले वर्ग—3 रा. कूष्णतारा अपार्टमेंट प्लॅट नंबर 2 मराठा काॅलनी” कसबा बावङा”कोल्हापूर यांनी तक्रारदार यांचेकडून 9,000/-रुपये स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून आरोपी यांचेविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाणे, जि. कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो नि. बापु साळुंके
पो.हे.कॉ. विकास माने
पो.हे.कॉ. सुनील घोसाळकर
पो.ना.सचिन पाटील
पो.कॉ. संदीप पवार
आदीनीं सापळा रचून केली.