येडशी येथील जनता विद्यालयात कर्मवीर सप्ताहाचे आयोजन

येडशी संतोष खुने :-
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या 122 व्या जयंतीच्या निमित्ताने येथील जनता विद्यालयात सालाबादप्रमाणे कर्मवीर सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले असून 29 जानेवारी 2025 पासून सात दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी कर्मवीर मामांना शाळा उभारण्यात सहकार्य करणाऱ्या त्यांच्या जुन्या शिलेदारांचा सत्कार करण्यात येणार असून त्या दिवशी व्ही.जी. पवार यांचे मामांच्या जीवनावरती व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे. 30 जानेवारी 2025 रोजी डॉ. रेखा ढगे धाराशिव व सौ किरण देशमाने रोटरी क्लब सचिव व उद्योजिका यांचे महिला सक्षमीकरण या विषयावर व्याख्यान होणार आहे. 31 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांचे विद्यार्थी सर्वांगीण विकास या विषयावर व्याख्यान होईल. 1 फेब्रुवारी 2025 रोजी मी कसा घडलो या सदरात यशदा उद्योग समूहाचे चेअरमन सुधीर सस्ते व भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष डॉ. श्री प्रशांत पवार यांचे व्याख्याने होणार आहेत.2 फेब्रुवारी 2025 रोजी बार्शी येथे महिला सबलीकरणावरती कार्यक्रम होणार असून त्यात येडशी व परिसरातील सुमारे 200 महिला सहभागी होणार आहेत.त्याच दिवशी सर्व विद्यार्थी व कर्मचारी श्री रामलिंग देवस्थान येथील परिसर स्वच्छता व प्लास्टिक मुक्ती साठी स्वच्छता मोहीम राबवणार आहेत. दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी येडशी व परिसरातील ग्रामस्थांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आलेले असून सह्याद्री मल्टीस्टेट हॉस्पिटल धाराशिव व जनता विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे 4 फेब्रुवारी 2025 रोजी कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेची गावातून शोभायात्रा काढली जाणार असून यात चित्ररथ दिंडी पथक, लेझीम पथक, झांज पथक, झुंबा डान्स ,टिपरी नृत्य, पथनाट्य त्याचबरोबर राष्ट्रीय व सामाजिक संदेश देणारे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
या कार्यक्रमासाठी ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य चंद्रकांत नलावडे सर यांनी केले आहे.