महाराष्ट्र

एक रुपयात पिक विमा योजनेची अंतिम मुदत 31 जुलै 2024 

 

पलूस ; एक रुपयात पिक विमा योजनेची अंतिम मुदत 31 जुलै 2024  आहे.संतोष चव्हाण
महाराष्ट्र शासन कृषि विभाग यांचे मार्फत नागठाणे अंकलखोप सूर्यगाव राडेवाडी या गावातील शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की,आपल्या पेरणी किंवा टोकणी केलेल्या भात सोयाबीन व भुईमूग या पिकाचा एक रुपयात पिक विमा मुदतीत आपल्या नजीकच्या सीएससी सेंटर, महा-ई-सेवा केंद्र, राष्ट्रीयकृत बँक, सहकारी बँक या ठिकाणी उतरावा व आपल्या पिकाचे नैसर्गिक आपत्तीपासून विमा संरक्षण करावे असे आवाहन कृषी अधिकारी संतोष चव्हाण यांनी केले आहे.
चव्हाण म्हणाले महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्यामार्फत प्रधानमंत्री पिक विमा योजना 2024 पिक विमा भरणे अंतिम मुदत 31 /7 /2024 असून या योजनेत कर्जदार, बिगर कर्जदार, भाडेपट्टीवर शेती करणारे इत्यादी सर्व शेतकरी या योजनेत सहभाग घेऊ शकतात.
विमा संरक्षित बाबी या योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अर्जदार शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती( गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी, वीज कोसळल्यामुळे लागणारे नैसर्गिक आग) व काढणे पश्चात नुकसान भरपाई ( गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस व बिगर मोसमी पाऊस या बाबी अंतर्गत नुकसानीची पूर्वसूचना नुकसानीच्या 72 तासाच्या आत क्रॉप इन्शुरन्स अॅप, कृषी रक्षक संकेतस्थळ सहाय्यता क्रमांक 14447 तसेच संबंधित बँक यांना द्यावी.
तसेच मागील काही दिवसापासून अनेक भागात सततच्या पावसाने नदी नाल्यांना पुर येवून शेती पिकाचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशावेळी पिक विमा भरलेल्या /संरक्षित क्षेत्राला नुकसान भरपाई मिळण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा पिक विमा भरला आहे त्यांनी झालेल्या नुकसानीची पूर्वसूचना संबंधित विमा कंपनीस 72 तासांमध्ये क्रॉप इन्शुरन्स अँप लिंक https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central वर कळवावी. विमा भरलेली पावती जपून ठेवावी असे आवाहन केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!