वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन प्रणित मिरज सिव्हिल बदली कामगार आणि कंत्राटी कामगार संघटना यांच्या वतीने, डॉ. प्रकाश गुरव (अधिष्ठाता) यांचा सत्कार

दर्पण न्यूज मिरज/सांगली :-: वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन प्रणित मिरज सिव्हिल बदली कामगार आणि कंत्राटी कामगार संघटना यांच्या वतीने, डॉ. प्रकाश गुरव (अधिष्ठाता) यांचा सत्कार करण्यात आला.
मिरज सिव्हिल तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न आस्थापना प्रशासकीय कायम कारभार म्हणून अधिष्ठाता या पदावर डॉ. प्रकाश गुरव यांची नियुक्ती करण्यात आली असल्याने
सोमवार,दि. १०/११/२०२५ रोजी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली यांचे प्रणित न्यायालयीन बदली कामगार तसेच कंत्राटी कामगार संघटना यांच्या वतीने डॉ. प्रकाश गुरव यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारेप्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी, सांगली जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, कार्याध्यक्ष जगदिश कांबळे, महासचिव अनिल मोरे सर, जिल्हा उपाध्यक्ष किशोर आढाव यांच्याबरोबर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सदस्य तसेच मिरज सिव्हिल हॉस्पिटल मधील न्यायालयान बदली कामगार तसेच कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


