मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सांगली जिल्हा दौरा

दर्पण न्यूज मिरज / सांगली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवार, दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार, दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11.50 वाजता हेलिकॉप्टरने हेलिपॅड-एम.आय.डी.सी.क्र. 1, कवलापूर, जि. सांगली येथे आगमन. सकाळी 11.55 वाजता मोटारीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, शिंदे मळा, अभयनगर, सांगलीकडे प्रयाण. दुपारी 12.05 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, शिंदे मळा, अभयनगर, सांगली येथे आगमन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा व महावितरणच्या उपकेंद्रांचे ऑनलाईन भूमिपूजन. दुपारी 12.50 वाजता मोटारीने हेलिपॅड- एम.आय.डी.सी.क्र. 1, कवलापूरकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता हेलिपॅड- एम.आय.डी.सी.क्र. 1, कवलापूर येथे आगमन व दुपारी 01.05 वाजता हेलिकॉप्टरने पुणेकडे प्रयाण.



