अहिंसेचा मार्ग हाच बुद्धांचा धम्म ; प्रा.एन डी जत्राटकर
निपाणी येथील रोहिणीनगर येथे तथागत गौतम बुद्धांची 2569 जयंती साजरी

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे) :- अहींसेचा मार्ग हाच तथागत गौतम बुद्ध यांचा धम्म आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत सामाजिक कार्यकर्ते प्रा. एन डी जत्राटकर यांनी केले. तथागत गौतम बुद्ध यांच्या 2569 जयंती निमित्त भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने निपाणी येथील रोहिणी नगर येथे आयोजित बुद्ध जयंती प्रसंगी उपदेश देताना ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले की विश्वातील मानव सुखी होण्यासाठी अहिंसेशिवाय पर्याय नाही युद्धाने कोणताच प्रश्न सुटणार नाही तर ते अधिक जटील होत जातात असे त्यांनी सांगितले.
यावेळी जेष्ठ विचारवंत एडवोकेट अविनाश कट्टी, भारतीय बौद्ध महासभा निपाणी तालुका संघटक पुंडलिक कांबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते द्विप प्रज्वलन करून तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा कर्नाटक व महाराष्ट्र राज्य समन्वय आयु. महेश धमरक्षित, जिल्हा मुख्य संघटक प्रा. अनिल मसाळे, जिल्हा सल्लागार कमिटी सदस्य पंडित कांबळे, निपाणी तालुका अध्यक्ष प्रताप शितोळे, तालुका कार्याध्यक्ष प्रा. प्रशांत कांबळे, तालुका खजिनदार उदय कांबळे, संघटक राज धनानंद, विनोद कांबळे, शशील वराळे, शशिकांत कांबळे, सामाजिक कार्यकर्ते राजकुमार मेस्त्री, संदीप कांबळे, प्रणव कांबळे, प्रमोद कांबळे, कुमार देवदास, कविता प्रधान, चांदनी पुजारी, कट्टी मॅडम, लोकेश घस्ते, अमित कांबळे, उमेश कांबळे, राहुल कट्टी, महेश पडलीहाळकर, कुणाल पुजारी अनुराग प्रधान, प्रभाकर माळगे, राहुल शितोळे, सदाशिव तराळ, शिवगोंडा बनकनवर, गोरखनाथ मधाळे, पांडूमा मधाळे, अनिल माने आदीसह लहान-मोठे उपासक- उपासीका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय बौद्ध महासभा जिल्हा अध्यक्ष अनिल प्रधान यांनी केले. व सूत्रसंचालन व स्वागत भरतीय बौद्ध महासभा कर्नाटक व महाराष्ट्र राज्य समन्वयक महेश धमरक्षित यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. अनिल मसाळे यांनी केले.