जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा
दर्पण न्यूज सांगली : राज्याचे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील हे शनिवार, दि. 26 एप्रिल 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दि. 26 एप्रिल रोजी दुपारी 2.30 वाजता हेलिकॉप्टरने बेळंकी ता. मिरज हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने म्हैसाळ विस्तारीत जत उपसा सिंचन योजना अंतर्गत बोगदा काम स्थळाकडे प्रयाण. दुपारी 2.40 वाजता म्हैसाळ विस्तारीत जत उपसा सिंचन योजना अंतर्गत बोगदा काम येथे आगमन व पाहणी. दुपारी 3.10 वाजता बेळंकी येथून मोटारीने आरग ता. मिरज कडे प्रयाण. दुपारी 3.30 वाजता आरग येथे आगमन व विस्तारीत जत उपसा सिंचन योजना कालवा काम पाहणीसाठी राखीव. दुपारी 3.50 वाजता आरग येथून मोटारीने बेडग ता. मिरज कडे प्रयाण. दुपारी 4 वाजता बेडग येथे आगमन व विस्तारीत जत उपसा सिंचन योजना पंप हाऊस पाहणीसाठी राखीव. दुपारी 4.30 वाजता बेडग येथून मोटारीने म्हैसाळ ता. मिरजकडे प्रयाण. दुपारी 4.45 वाजता म्हैसाळ येथे आगमन व म्हैसाळ विस्तारीत बॅरेज पाहणीसाठी राखीव. सायंकाळी 5.15 वाजता म्हैसाळ येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह कोल्हापूरकडे प्रयाण.